एक्स्प्लोर
राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी
बुलडाणा : राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची भविष्यवाणी बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवडमध्ये वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
पिकांबाबत काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?
- तुरीचं वर्तमान वर्षासारखा भरपूर उत्पादन होणार नाही
- कापसाचं सर्वसाधारण पीक येईल. मात्र, काही भागात कापसाचं जास्त, तर काही भागात कमी उत्पादन येईल.
- ज्वारीचं उत्पादन साधारण राहील. मात्र, भावात तेजी-मंदी राहील.
- बाजरीचे पीकही साधारणच राहील.
- तिळाचे पीक साधारण राहीलय माच्क. पण भाव वधारेल.
- जून महिन्यात कमी पाऊस पडेल.
- जुलै महिन्यात पाऊस साधारण पाऊस असेल. मात्र, जूनपेक्षा जास्त पडेल.
- ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल.
- सप्टेंबर महिन्यात जून महिन्यासारखाच कमी पाऊस पडेल.
- अवकाळी पाऊस भरपूर होईल.
- राजा कायम आहे, पण त्याच्यासमोर अडचणी अनेक येतील.
- गादीवर खडे दिसत असल्यामुळे राजाला संकटाचा सामना करावा लागेल. मात्र, राजा टिकून राहील.
- देशाला चलन तुटवड्याचा सामना करावा लागेल.
- घुसखोरी अनेक वेळेला होईल, पण भारतीय सैन्य त्याला सडेतोड उत्तर देतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement