एक्स्प्लोर

Bharat Gogawale : गोगावलेंचाच व्हीप वैध, हा सत्याचा विजय, भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

Bharat Gogawale : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचा निर्णय दिलाय. यावर भरत गोगावले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.

मुंबई : भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी वैध ठरवला आहे. यावर शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. हा सत्याचा विजय असल्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आली असल्याचं भरत गोगावले यांनी यावेळी म्हटलं. लोकं आमच्यावर जी काही टीका करत होते, त्याचा निकाल आज लागल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं. 

त्यांनी आमच्यावर काहीही आरोप करु देत, आम्ही त्यांना आमच्या कामांनी उत्तर देऊ, असं म्हणत भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत मी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. आम्ही जे काही केलं त्याचा आज विजय झालाय. ते जे काही करतील त्यामुळे त्यांच्याच अडचणी वाढतील, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. 

नेमका निकाल काय?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. 

दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

हेही वाचा : 

Eknath Shinde : आजच्या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Radhakrishna Vikhe Patil: विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Rajya Sabha Election 2026: आयारामांना नव्हे तर पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या; राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा
आयारामांना नव्हे तर पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या; राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
Embed widget