एक्स्प्लोर

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया, दुसऱ्याच दिवशीपासून असह्य वेदना, महिलेचा मृत्यूनंतर भंडाऱ्यात मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबियांचे आंदोलन

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॉलेजची टीम महिलेने उपचार घेतलेल्या  खाजगी रुग्णालयापासून शासकीय रुग्णालयापर्यंत सखोल चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे .

Bhandara: कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान दोन महिन्यांनंतर तिचा मृत्यू झाला . सदोष ऑपरेशनमुळे हा मृत्यू झाल्याचे सांगत संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या विरली इथे घडलाय . महिलेचा ऑपरेशन करणाऱ्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांसह ग्रामस्थ करत होते . याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडेही पाठवण्यात आलाय .मेधा आकाश बनारसे (24) असं या मृत महिलेचं नाव आहे . या घटनेनंतर भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली होती . विरली गावात महिलेचा मृतदेह रस्त्यावर ठेवत ग्रामस्थ संतप्त होते. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी नागपूर मेडिकल कॉलेजचे पथक आज भंडाऱ्यात दाखल होणार आहे .भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॉलेजची टीम महिलेने उपचार घेतलेल्या  खाजगी रुग्णालयापासून शासकीय रुग्णालयापर्यंत सखोल चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे .

नक्की प्रकरण काय ?

भंडारा जिल्ह्यातील विरली तालुक्यात राहणाऱ्या मेधा बनारसे या महिलेने 16 नोव्हेंबर रोजी सरांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कुटुंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया केली . या शस्त्रक्रियेनंतर महिलेला प्रचंड वेदना होऊ लागल्या . त्यामुळे कुटुंबीयांनी तिला जिल्ह्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले . मेधावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली . आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या कुटुंबीयांनी 18 जानेवारी रोजी खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मेधाला दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान मेघाचा मृत्यू झाला .या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी मेघाचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रात्रभर आंदोलन केले आहे . कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबीयांनी उपोषण आंदोलन मागे घेतले .

डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियानंतर मेघा बनारसे या महिलेची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा दोन महिन्यानंतर मृत्यू झाला. यामुळं संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा मृतदेह रविवारी दुपारी रस्त्यावर ठेवून रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या विरली इथं घडला. याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडं पाठविण्यात आला आहे. या दोन डॉक्टरांमध्ये विरली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रसुरेश डोंगरवार आणि प्रसुतीतज्ञ डॉक्टर रोशनी राऊत या दोघांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात काल पाठविला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजचं पथक आज भंडाऱ्यात दाखल होत आहे. भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॉलेजची ही टीम महिलेने उपचार घेतलेल्या खाजगी रुग्णालयापासून ते शासकीय रुग्णालयातील संपूर्ण चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद श्यामकुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget