एक्स्प्लोर
पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे

मुंबई: भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा महाभारतामध्ये आता अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी एंट्री घेतली आहे. 'पंकजाताई मुंडे यांचं संभाषण गंभीर आहे. कायदा तयार करणारे कायदा हातात घेण्याची उघड भाषा करतात आणि सत्ता, पदाचा गैरवापर सुरु आहे.' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. 'कायदा हातात घेणाऱ्या अशा मंत्र्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकारच नाही. मुख्यमंत्री याप्रकरणी काय करणार याकडे आता आमचं लक्ष लागून राहिलं आहे.' असंही मुंडे म्हणाले. भगवानगडावरील वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन जोरदार वादंग उठलं आहे. संबंधित बातम्या: ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आणखी वाचा























