एक्स्प्लोर
निर्जनस्थळी प्रेमी युगुलांना लुटणारी पाच जणांची टोळी अटकेत
तरुणींची छेडछाड करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दागिने लुटल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीने दिली.

बेळगाव : निर्जनस्थळी गेलेल्या प्रेमी युगुलांना धमकावून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. युवक-युवतींना धमकावून, मोबाईलवर त्यांचं चित्रीकरण करुन पाच जणांची टोळी त्यांना लुटत असल्याचा आरोप आहे. शारुख किल्लेदार, रहीम, मोहम्मद बोंबेवाले, जावेद अत्तार आणि मोहम्मद बेपारी या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. कॅम्प पोलिस स्थानकाच्या हद्दीत त्यांनी प्रेमीयुगुलांना चाकूचा धाक दाखवून त्यांचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. तरुणींची छेडछाड करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दागिने लुटल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीने दिली. दोन दिवसांपूर्वी प्रेमी युगुलाला चाकूचा धाक दाखवून टोळक्याने तरुणीशी असभ्य वर्तन केलं. व्हिडीओ चित्रीकरण करुन आता रात्रीच तुमचं लग्न लावतो, असं धमकावून मोबाईल, रक्कम आणि सोन्याचे दागिने पाच जणांनी लुबाडले होते. केवळ प्रेमीयुगुलांना निर्जनस्थळी गाठून त्यांना हे पाच जण लुटत होते. अखेर पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचून पाच जणांना जेरबंद केलं. प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला अटक केल्याबद्दल कॅम्प पोलिसांचं महानिरीक्षक रामचंद्रराव यांनी अभिनंदन करुन त्यांना 50 हजार रुपयांचे रोख रकमेचं बक्षीस जाहीर केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























