एक्स्प्लोर

महिला दिन विशेष : 'बीजमाता' राहीबाई पोपेरेंसह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्यासह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज त्यांचा सन्मान झाला.

अहमदनगर : महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्यासह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज त्यांचा सन्मान झाला. आपण केलेल्या मेहनतीचं  फळ मिळालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सन्मानामुळे आणखी काम करण्यासाठी  बळ मिळेल, असे राहीबाईंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. WATCH VIDEO | 'बीजमाता' राहीबाई पोपरे यांच्यासह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यात आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या  राहीबाई पोपेरे यांचाही समावेश होता. WATCH VIDEO | राहीबाई पोपेरेंना हक्काचं घर मिळणार | माझा इम्पॅक्ट | अहमदनगर | एबीपी माझा केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील  सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्यातील  राहीबाई पोपेरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान झाला. महाराष्ट्रातील या सहा दिग्गज महिलांचा सन्मान मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 15000 पेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले.  शिवाय त्यांनी  स्वत: ची शुटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे  हे तंत्र भारतीय सेनेनही स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या  सुप्रसिद्ध कथक नृत्यागंना सीमा मेहता  यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी   उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने जो ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात आले. मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून  पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समूह सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी  बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा  यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. WATCH VIDEO | देशी वाणाच्या बँकर राहीबाई पोपेरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Politician Case | आका उदंड, कार्यकर्ते गुंड ; निकटवर्तीयांच्या कारनाम्यामुळे कोण कोण अडचणीत?ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8  PM TOP Headlines 8 PM 11 March 2025Job Majha | भारतीय नौदलात नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? शैक्षणिक पात्रता काय?Jayant Patil : दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना  पर्याय नाही, मी जुना खेळाडू आहे ...तर कपात  होणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
Embed widget