एक्स्प्लोर

मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यात संचालकाला पुण्यातून ठोकल्या बेड्या, पैसे बुडवून पोलिसांना देत होता गुंगारा, काय आहे प्रकरण?

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्यानंतर आता राजस्थान मल्टिस्टेट घोटाळ्याच्या तपासाला वेग येणार असून पतसंस्थांच्या गैरकारभाराला चाप लावणार का?आणि कधी लावणार? असा प्रश्न आता समोर येत आहे.

Beed: सध्या बीडमधून मल्टीस्टेटच्या घोटाळ्यांचा फेरा वाढताना दिसत असून ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण ताजे असतानाचा आता राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यासंदर्भात बीड आर्थिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली आहे. राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.त्याला आता बीड ला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट च्या प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे.

राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी लातूर,परळी,नांदेड,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.बीड मधील राजस्थानीसह ज्ञानराधा,जिजाऊ यासह अनेक मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत.. बीड जिल्ह्यातीलच ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये कुठे होती रुपयांच्या ठेवी अडकल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णीना पुण्यातून अटक झाली होती. दरम्यान, आज राजस्थानी मल्टीस्टेट संदर्भात पुण्यातूनच अभिषेक बियाणी याला अटक झाली आहे.

नक्की प्रकरण काय?

राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्खं संचालक मंडळच या घोटाळ्यात सामील होते. यात ठेवीदारांचे जवळपास 300 कोटी रुपये बुडवत बीडच्या परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत पोबारा केल्याची संतापजनक घटना घडली होती. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातील 17 जणांवर फसवणूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून केला घोटाळा

बीड जिल्ह्यातील परळीत 142 ठेवीदारांचे 7 कोटी 53 लाख  29 हजार  967 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या मल्टीस्टेट घोटाळयात 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 300 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात राजस्थान मल्टीस्टेटचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हा शाखेंनं ताब्यात घेतलं आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्यानंतर आता राजस्थान मल्टिस्टेट घोटाळ्याच्या तपासाला वेग येणार असून पतसंस्थांच्या गैरकारभाराला चाप लावणार का?आणि कधी लावणार? असा प्रश्न आता समोर येत आहे.

खातेदारांचे पैसे नेले हाँगकाँगला

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची माहिती समोर आली. गत आठवड्यातच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेला हे पैसे हाँगकाँगला कसे नेले याबाबत माहिती विचारली. या चौकशीला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget