एक्स्प्लोर
डॉक्टरांचे आठ लाख चोरुन रुग्ण पसार
आजारी असल्याचा बहाणा करुन डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या इसमाने ड्रॉवरमधून आठ लाखांची चोरी केली.
बीड : डॉक्टरांच्या ड्रॉवरमधून आठ लाखांची रोकड लंपास करुन रुग्ण पसार झाल्याची घटना बीडमध्ये समोर आली आहे. आजारी असल्याचा बहाणा करुन डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या इसमाने ही चोरी केली.
बीड शहरात जालना रोडवर ‘कृष्णाई’ हा डॉ. चंद्रकांत नवनाथ नेवाडे यांचा दवाखाना आहे. बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास डॉ. नेवाडे दवाखान्यात असताना बी-बियाणे आणि दवाखान्याची उपकरणं खरेदी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी आठ लाख रुपये त्यांच्याजवळ आणून दिले.
ही रक्कम एका पिशवीत घालून डॉ. नेवाडे यांनी स्वतःच्या केबिनमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. त्यानंतर 3.45 वाजताच्या सुमारास त्यांच्याकडे श्रीनिवास नावाचा रुग्ण आला. श्रीनिवास हा महामार्गाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीसाठी काम करतो. त्याने केबिनमध्ये आल्यानंतर पोट दुखत असल्याचं डॉक्टरांना सांगितलं.
रुग्णाची तपासणी करण्यासाठी हातमोजे आणण्यासाठी डॉ. नेवाडे शेजारच्या खोलीत गेले. हातमोजे घेऊन केबिनमध्ये परत आल्यानंतर डॉक्टरांना तिथे रुग्ण दिसला नाही. त्यांनी त्याला इतरत्र पाहिलं, पण तो न दिसल्यामुळे त्यांनी केबिनमध्ये येऊन ड्रॉवर उघडून पाहिला असता त्यांना आठ लाख रुपये ठेवलेली पिशवी लंपास झाल्याचं लक्षात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement