एक्स्प्लोर

बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच पक्ष संपवतील : पंकजा मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवाराने ऐनवेळी माघार घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची अगतिकता आहे, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ''बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत,'' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ''राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो आणि अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचंच फलित म्हणजे सुरेश धस आमच्याबरोबर आहेत,'' असंही त्या म्हणाल्या. ''बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली, राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, आता आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत, आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही ताकत लावू, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे. विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. संबंधित बातम्या :

पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!

उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?

आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे

विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Saamana Article: '....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
'....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
BEST Bus Accident: 'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget