एक्स्प्लोर

Beed : बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीमध्ये अशी होणार लढत

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीमध्ये निवडणूकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीमध्ये निवडणूकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

केज नगरपंचायत निवडणुकीत रजनी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

केज नगरपंचायत ही काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या ताब्यात मागच्या दहा वर्षापासून आहे. पुन्हा एकदा पाटील कुटुंबियांनी ही नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.  विशेष म्हणजे केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेससमोर राष्ट्रवादीचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी काँग्रेससमोर केसमध्ये तगडे आव्हान उभे केले आहे

अशी आहे लढत?

  • काँग्रेस - 17 जागेवर लढत आहे 
  • राष्ट्रवादी काँग्रेस  - 17 जागेवर लढत आहे 
  • जनविकास आघाडी - 17 जागेवर लढत आहे 
  • शिवसेना - 13 जागेवर लढत आहे 

आष्टी नगरपंचायत पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी कंबर कसली

आष्टी नगरपंचायत मध्ये आमदार सुरेश धस गटाची सत्ता आहे. मात्र मागच्या त्या वेळेस निवडणूक झाली होती. त्या वेळेस सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार मागच्या टर्ममध्ये निवडून आले होते. यावेळी भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष आष्टी नगरपंचायत मध्ये पाहायला मिळणार आहे

अशी होणार लढत 

  • भाजप - एकूण 17 जगावर निवडणूक लढत आहे ( यात भाजपचे 14 उमेदवार आणि तीन उमेदवार हे पुरस्कृत आहे )
  • महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस सतरा जागेवर लढत आहे

पाटोदा नगरपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी पुन्हा सुरेश धस गट  सक्रिय झाला

पाटोदा नगरपंचायत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे. पुन्हा ते नगरपंचायत ताबा ठेवण्यासाठी सुरेश धस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. पाटोदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना भाजपसोबत होणार आहेत तर शिवसेना 17 पैकी चार जागेवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहे

अशी असेल लढत 

  • भाजपा 17 पैकी 14 जागेवर निवडणूक लढत आहे. तर तीन जागेवर भाजप पुरस्कृत उमेदवार उभे आहेत
  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत 17 जागेवर निवडणूक लढवत आहेत 
  • शिवसेना चार जागेवर निवडणूक लढवत आहे.

शिरूर नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष.. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची प्रतिष्ठा पणाला

शिरूर नगरपंचायत ही आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे. मात्र या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मोठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. खर तर महबूब शेख आणि सुरेश धस हे एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. मात्र सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादीची बाजू शिरूरमध्ये लावून धरली आता या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लोक कोणाच्या बाजूनं उभे राहतील हे मतमोजणीनंतर कळणार आहे.

अशी होणार लढत

  • भाजपा एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे
  • राष्ट्रवादी एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे
  • काँग्रेस चार जागेवरती निवडणूक लढत आहे
  • शिवसेना एकूण 12 जागेवरती निवडणूक लढत आहे

वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी चा संघर्ष

वडवणी नगरपंचायत ही भाजपाच्या ताब्यात आहे राजाभाऊ मुंडे कुटुंबीयांनी हे नगरपंचायत पुन्हा भाजप च्या ताब्यात ठेवण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती हे विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांनी भाजपसमोर या निवडणुकीत कडवे आव्हान उभे केले होते त्यामुळे वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळाला

अशी होणार लढत

  • भाजप एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे.
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस चौदा जागेवर निवडणूक लढत आहे. तर तीन जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार उभे आहेत
  • शिवसेना पाच जागेवर निवडणूक लढत आहे
  • काँग्रेस चार जागेवर निवडणूक लढत आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
Delhi Police Lathicharge: दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Embed widget