एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बूटचोरी राड्यानंतर लग्न मोडलेल्या युवतीचा पुन्हा निकाह
बूटचोरी राड्यानंतर लग्न मोडलेल्या वधूची सोयरीक बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी जुळली.
बीड : बूटचोरीवरुन झालेल्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूची सोयरीक जुळली.
लग्नात मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असा सध्याच्या लग्नातला ट्रेण्ड आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात बूट चोरण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि रविवारी भर लग्नातच राडा झाला. सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
अंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाशी तरुणीचं लग्न झालं. निकाह मोडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.
नेमकं काय घडलं?
नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी सुलतान युनूस शेखचा रविवारी निकाह झाला. लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. मात्र सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झालं.
लग्नात बूट लपवल्यावरुन वाद, नवरदेवाचं डोकं फुटलं, लग्नही मोडलं!
लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. मग नवरदेवाने मुंडावळ्या आणि सेहरा काढून फेकून दिला. यानंतर जे घडलं, ते अतिशय धक्कादायक होतं. या हाणामारी नवरदेवाचं डोकं फुटलं आणि त्याला सहा टाके पडले. सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे. ..आणि तलाक झाला! सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली. मात्र ही मंडळी पोलिस स्टेशनला गेल्याचं कळताच वधूकडच्या मंडळीनी वऱ्हाडींचा टेम्पो अडवून ठेवला. बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक झाल्यावरच संपला. यानंतर वराकडची मंडळी तुळजापूरला परतली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement