एक्स्प्लोर

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा बडतर्फ

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस देशमुख यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस देशमुख यांना बडतर्फ करण्याचे आदेश सहकार सहनिबंधकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेने शेतकरी सन्मान योजनेतील पैसे शेतकऱ्यांना न देता ते बँकेत ठेवण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या दहा वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. आदित्य सारडा हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. काय आहे प्रकरण? 2017 मध्ये फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या नावाने कर्जमाफी जाहीर केली, यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 15 अन् जास्तीत जास्त 25 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आले होते. बीड जिल्हा बँकेत तब्बल 18 हजार शेतकऱ्यांना 24 कोटी 65 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा करता बँकेने ते ठेविदारांना वाटप करुन एकप्रकारे गैरव्यवहार केला, अशी तक्रार कालिदास आपटे यांनी केली होती. या प्रकरणी लातूर सहनिबंधक यांच्याकडे 14 महिने सुनावणी झाली, त्यानंतर सहनिबंधक यांनी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष पदावरुन आणि संचालक पदावरुन पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बँकेचे सरव्यवस्थापक बी. एस. देशमुख यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये कोणतीही अफरातफरी झाली नाही, शेतकऱ्यांचे पैसे हे बँकेत खात्यावर जमा होते. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलणार असे बँकेचे बडतर्फ अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. यापूर्वीही बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वादात - सप्टेंबर 2018 ला राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. हेही वाचा - शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा Beed Farmers | बीडमधील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत? | बीड | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Embed widget