Beed Crime: महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला सुरुवात, एसआयटीकडून परळीतील 50 जणांची झाडाझडती
पोलीस उपाअधिक्षक अनिल चोरमले यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली असून खून कोणी केला? कारण काय होते ? यासाठी साक्षीदारांच्या झाडाझडतीला सुरुवात करण्यात आली आहे.

Beed: परळीतील महादेव मुंडे यांची निर्घृणपणे शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर हत्या करण्यात आली. खूनाला 15 महिने उलटले तरी आरोपी फरार आहे. हा खून कोणी केला आणि कशासाठी केला त्याचा तपास पोलिसांकडून होऊ शकला नव्हता. महादेव मुंडेंची (Mahadev Munde) पत्नी मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात खेटे मारत होते मात्र तपास होत नसल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. मुंडे कुटुंबियांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरताना दिसत आहेत. एसआयटीकडून परळीतील 50 जणांची झाडाझडती करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. परळीतील महादेव मुंडे प्रकरणात जे पाच सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलीस उपाअधिक्षक अनिल चोरमले यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली असून खून कोणी केला? कारण काय होते ? यासाठी साक्षीदारांच्या झाडाझडतीला सुरुवात करण्यात आली असून 50 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. (Beed)
तपासाची चक्रे फिरली, 50 हून अधिक जणांची झाडाझडती
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले आणि विशेष पथकाकडून केला जातो आहे.परळी शहरात आतापर्यंत या प्रकरणात साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शी असे 50 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे .पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांचे महादेव मुंडे हत्या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत असूनहे पथक परळीत तळ ठोकून असून पथकाकडून कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी निष्पन्न करण्यासाठी विशेष पथकाकडून शोध घेतला जात आहे..16 महिन्यांपूर्वी परळी शहरातील महादेव मुंडे यांचा खून झाला होता या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. या प्रकरणाचा आता पुन्हा नव्याने तपास सुरू करण्यात आला आहे.
महादेव मुंडेंच्या तपासासाठी पथकाची नेमणूक
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पत्रकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे .एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे .महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर या तपासाच्या तपासासाठी पाचसदस्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
