एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; RTI कार्यकर्ते विजय कुंभारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावांबाबत केले गंभीर आरोप

Vijay Kumbhar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विना परवानगी आणणे, बैठकीसमोर न आलेल्या विषयाला मान्यता मिळाली म्हणून टेंडर काढणे असे अनेक प्रकार केल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जो विषय मंत्रिमंडळाच्या समोर आलाच नाही, तो विषय मंत्रिमंडळाने पास केल्याचं भासवून टेंडर काढल्याचा गंभीप आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विना परवानगी आणणे,  बैठकीसमोर न आलेल्या विषयाला मान्यता मिळाली म्हणून टेंडर काढणे असे अनेक प्रकार केल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप आहे. त्याचबरोबर बॅटरी ऑपरेटेड-स्प्रे पंपाच्या निर्णय ही असाच घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी उत्पादीत केलेल्या सोलार लाईट ट्रॅपचा निर्णय ही दिशाभूल करुन घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या टेंडर प्रक्रियेवरुन धनंजय मुंडे आणि तत्कालीन कृषी सचिव यांच्यात त्यावेळी वाद झाल्याची माहिती आहे. म्हणुनच तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित झाला आहे. विजय कुंभार यांनी याबाबत सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे.

विजय कुंभार यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचे भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले.त्यानंतर काही जणांनी, असं घडणं शक्य नाही. मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचे भासवणे शक्य नाही, अशी भाषा वापरायला सुरुवात केली. परंतु हे काही प्रथमच घडलं आहे.अशातला भाग नाही. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती. महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी ॲम्बुलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता.त्यामध्येही 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला आहे असं भासवून 15 मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता. 

यासंदर्भात मी मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात कागदपत्रांचे अवलोकन केले असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता परंतु तो मंजूर झाला नव्हता असे दिसून आले.(मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आणि अतिरिक्त अशा दोन कार्यपत्रिका ठेवण्यात येतात. दोन्ही पैकी मंजूर झालेल्या प्रस्तावांचे नंतर एकत्रित इतिवृत्त तयार करण्यात येते.) या बाबतची जनहित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आहे. त्यामुळे मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सगळं काही नियमानुसार चालतं अशा भ्रमामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही.ज्यांना त्या भ्रमात राहायचंय त्यांनी खुशाल रहावं, त्या बाबतीत हरकत नाही. 

परंतु प्रश्न असा पडतो की, अशा वेळी तक्रार कुणाकडे करायची आणि त्याचा उपयोग काय? कारण ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांनाही सगळं माहिती असतं किंबहुना ते त्यात सामिल असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा प्रस्ताव,काम किंवा निविदा मंजूर होते तेव्हा त्यापूर्वी अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते.म्हणजे त्यासाठी आर्थिक तरतूद आहे का? सगळ्या बाबी कायदेशीर आहेत का ? संबंधित सर्व विभागांची मान्यता आहे का? वगैरे वगैरे आणि हे सर्व पाहण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. परंतु जे अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांची तो मंजूर झाला आहे असे भासवून कागदपत्रे रंगवतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आणि मंत्री मात्र अंगाशी आलं की अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात.असं केलं तरचं करोडो रुपयांची माया जमा होते,रंगेल आयुष्य जगता येते आणि चार्टर फ्लाईटने परदेश दौरे करता येतात ना?, अशी पोस्ट विजय कुंभार यांनी शेअर केली आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत झळकले बॅनर, जय पवारही म्हणाले सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री; भाजपचे जयकुमार गोरे म्हणतात, 2029 ला देवाभाऊच
बारामतीत झळकले बॅनर, जय पवारही म्हणाले सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री; भाजपचे जयकुमार गोरे म्हणतात, 2029 ला देवाभाऊच
मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
Pune Crime News : आई सोडून गेली; फिरायला सांगून बापाने दोन्ही लेकरांना जंगलात नेलं, साडेतीन वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मुलाला...; कृर घटनेनं पुणे हादरलं
आई सोडून गेली; फिरायला सांगून बापाने दोन्ही लेकरांना जंगलात नेलं, साडेतीन वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मुलाला...; कृर घटनेनं पुणे हादरलं
NCP Rajya Sabha Candidate: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाची पदं भरणार; महिला आयोग, प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नावं चर्चेत
सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाची पदं भरणार; महिला आयोग, प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नावं चर्चेत

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget