Beed : RBI चा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बॅंकेला दणका, व्यवहारावर घातले निर्बंध
Beed : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने तब्बल सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत.
Beed : बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेने मोठे निर्बंध लागू केले आहेत. विशेष म्हणजे हे निर्बंध पुढचे सहा महिने लागू असणार आहेत. द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेमध्ये अनियमितता आढळल्यास नंतर रिझर्व बँकेने या बँकेवर प्रशासक मंडळ नेमले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून द्वारकादास मंत्री बँकेचा पूर्ण व्यवहार हा प्रशासक मंडळ सांभाळत असतानाच आता पुन्हा रिझर्व्ह बँकेने मंत्री बँकेच्या आर्थिक व्यवहारावरही निर्बंध घातले आहेत. यापुढे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेतून कोणत्याही खातेदाराला 5000 रुपये पेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. तसेच बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय कोणत्याही कर्जाचे नुतनीकरण करता येणार नाही, नवीन ठेवी घेता येणार नाही किंवा नवीन कर्जही देता येणार नाही. तब्बल सहा महिन्यासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणात माजी संचालकांवर गुन्हे दाखल झालेले असतानाच आता बँकेच्या आर्थिक व्यवहारावरदेखील रिजर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता खातेदारांना पाच हजारापेक्षा अधिकची रक्कम काढता येणार नाही.
द्वारकादास मंत्री बँकेवर कोणते आहेत आक्षेप ?
बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेमध्ये 229 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यावर आता पंचवीस हजाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारी 2021 मध्ये द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या आंतरशाखीय समायोजन व्यवहाराची विशेष तपासणी केली होती. यात बँकेतील नियमांचे उल्लंघन झाल्याने यात दोषी असलेल्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठीचा अहवाल सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे सादर केला होता आणि त्याच अनुषंगाने सहकार आयुक्तांनी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुभाष सारडा यांचा मुलगा आदित्य सारडा हा पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती आहे. आदित्य सारडा हे बीड जिल्हा बँकेत मागील पाच वर्ष अध्यक्ष होते. बँकेमध्ये झालेला गैरव्यवहार प्रशासकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासक मंडळाचे सदस्य बीबी चाळक यांच्या फिर्यादीवरून 229 कोटी 5 लाख रुपयाचा अपहार झाल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुभाष सारडा यांच्यासह 25 जनावर आता या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या संचालक मंडळांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
संबंधित बातम्या
MPSC: अश्विनी धापसे एमपीएससी परीक्षेत एनटी क प्रवर्गातून राज्यात पहिली
चॅनेल लागले तर हे सुरू..., इतर वेळी मग काय सुरू, काय चाललंय?; राज ठाकरेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
Sanjay Raut: आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, आम्ही बोलत राहू; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha