एक्स्प्लोर

चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांना मारहाण, अहमदनगरच्या जामखेडमधील घटना

गावात अनोळखी गाडी आल्याने गावातील लोकांना त्यांच्या गाडीवर संशय आला. म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक सह चौघांना मारहाण केली. 

अहमदनगर : चोर समजून चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात घडली आहे. बुलडाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे हे आपल्या नातेवाईकांकडे आरणगाव येथे आले होते. दरम्यान किरण कांबळे हे त्यांचे भाऊ विशाल कांबळे, सासरे संजय निकाळजे आणि सुनील निकाळजे यांच्यासोबत गावठी कोंबड्या खरेदी करण्यासाठी गेले. ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने 'चोर-दरोडेखोर' समजून स्थानिक दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून गाडी थांबवली. त्यांनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सोबतच्यांना जमलेल्या 20 ते 25 जणांनी सदर वाहनावर दगड मारून वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड, बांबू, दगड व काठीने मारहाण केली.
       
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांचे भाऊ विशाल भानुदास कांबळे यांचा आष्टी तालुक्यातील पांडेगवहाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते खेडोपाडी जाऊन कोंबडी खरेदी करत असतात. दरम्यान ते कोंबड्या खरेदी करण्यासाठी खेडोपाडी गेले होते पण कोंबड्या न मिळाल्याने अरणगाव बसस्थानक येथे आले. नुकत्याच काही दिवसांपूर्वीच आरणगाव शेजारील वंजारवाडी येथे दरोडा पडला होता. त्यातच गावात अनोळखी गाडी आल्याने गावातील लोकांना त्यांच्या गाडीवर संशय आला. म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक सह चौघांना मारहाण केली. 

चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांना मारहाण, अहमदनगरच्या जामखेडमधील घटना

आरणगाव येथे गदारोळ सुरू असल्याची माहिती समजताच गावचे सरपंच अंकुश शिंदे आणि त्यांचे सहकारी वेळीच तिथे आले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या जमावातून पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांना सोडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या मारहाणीत चौघेही किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांचे भाऊ विशाल कांबळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात 25 जणांविरोधात भादवी कलम 307, 341, 329, 324, 143, 147, 148, 149, 500, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget