एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी शिक्षकानं सोडली नोकरी, राजीनामा पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) खिंडार पडले असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

Baramati Indapur Teacher News: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) खिंडार पडले असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दीपक खरात यांनी शिक्षक नोकरीचा राजीनामा दिला आणि आता ते पूर्ण वेळ शिवसेनेचे काम करणार आहेत. खरात यांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून शिवसैनिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. गेली 10 वर्ष दीपक खरात हे शिवसेनेचं काम करीत होते. परंतु त्यांना पूर्ण वेळ काम करता येत नसल्याचं खरात सांगतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.  त्यांचं राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी 27 तारखेला दीपक खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन एक अनोखी भेट उद्धव ठाकरेंना दिली आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.


उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी शिक्षकानं सोडली नोकरी, राजीनामा पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा देणारा राज्यातील  पहिलाच शिक्षक

दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. एक फेब्रुवारी 2002 पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत होते. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने इतकी झाली आहे. अनेक जण शिवसेनेला सोडून गेले आहेत तर अनेक जण नव्याने सेनेत प्रवेश करीत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा देणारा बहुधा राज्यातील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

इतर काही महत्वाच्या बातम्या

Shivsena : शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार? आज भूमिका मांडणार, चर्चाना मिळणार पूर्णविराम

Maharashtra Government :  शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, जाणून घ्या महिनाभरातील घडामोडींचा आढावा

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget