एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांच्या ‘झिरो बॅलन्स’ खात्यावर अनुदान कमी, अन् दंडच जास्त!

वर्धा जिल्ह्यात एकूण 40 हजार, तर संपूर्ण राज्यात 37 लाख 62 हजार लाभार्थी आहेत. त्यात बँकांनी दंडाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल केले असल्याचा आरोप केला.

वर्धा : सरकार शिष्यवृत्तीसह विविध योजनांचं अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करतं. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातेही उघडण्यात आले आहे. पण काही बँकांनी विद्यार्थ्यांच्या ‘झिरो बॅलन्स’ खात्यातून व्यवहार होत नसल्याने आणि मिनिमम बॅलन्स नसल्याने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. बँकांच्या या अजब कारवाईमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. सरकारकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुला-मुलींकरीता वेगवेगळ्या 28 प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. सरकारने डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीनं विविध अनुदानं आणि शिष्यवृत्ती वितरित करण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती, योजनांची अनुदानं विद्यार्थ्यांचा खात्यात जमा करण्यात येतात. वर्धा जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गणवेशासाठी विद्यार्थ्यांना 400 रुपयांचं अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आलं. पण बहुतांश बँकांनी मिनीमम बॅलन्स नसल्याचे कारण देत अनुदानाच्या रकमेतून दंड कापून घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतानादेखील दंड आकारणीची ही बाब अन्यायकारक असल्याच सांगून जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज तेलंग यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत मुद्दा उपस्थित केला. वर्धा जिल्ह्यात एकूण 40 हजार, तर संपूर्ण राज्यात 37 लाख 62 हजार लाभार्थी आहेत. त्यात बँकांनी दंडाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल केले असल्याचा आरोप केला. धनराज तेलंग यांनी त्यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रातील काही शाळांमधील दंडाची प्रकरणं बँक अधिकाऱ्यांसमोर मांडली. पण बँकेचा सर्व्हर सिस्टमचं कारण सांगत बँक अधिकाऱ्यांनी हात वर केले. जिल्हा परिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बँकांना विचारणा करुन माहिती मागवली आहे. बँकांनी अशा पद्धतीनं दंड कपात करु नये, अशा सूचना बँकांना दिल्या जातील, असं अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगिल आहे. सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या योजना, शिष्यवृत्तींचे पैसे किंवा अनुदानं बँक खात्यात आल्यानंतर, त्यातूनच दंडाची रक्कम बँका कापत असल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळू शकत नाही. कधी कधी अनुदानापेक्षा दंडाची रक्कम जास्त होते आहे. त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर, असं म्हणायची वेळ विद्यार्थ्यांच्या पालकांवर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Embed widget