एक्स्प्लोर
तूरप्रश्नी आ. बच्चू कडूंचा विभागीय कार्यालयात ठिय्या

अमरावती: आमदार बच्चू कडू यांनी तूर खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी अमरावतीत ठिय्या आंदोलन सुरु केलं. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. सरकारनं 22 एप्रिलनंतर नाफेडतर्फे सुरु असलेली तूर खरेदी बंद केली आहे. एका बाजूला अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक असताना, खरेदी बंद झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारनं तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. सरकारच्या तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध करत प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















