Babasaheb Purandare Passed Away : एका युगाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

Shivshahir Babasaheb Purandare Passed Away : एका युगाचा अस्त! शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन. वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास.

abp majha web team Last Updated: 15 Nov 2021 10:41 AM

पार्श्वभूमी

Shivshahir Babasaheb Purandare Passed Away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी...More

इतिहासातील एक अध्याय काळाच्या पडद्याआड– विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  

मुंबई - शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे, इतिहासकार, नाटककार, लेखक अशी विविध क्षेत्रे आपल्या प्रतिभेने गाजवणारे आणि त्यांना अजरामर करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नाही तर इतिहास, नाट्य क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. शिवचरित्र सहज सोप्या भाषेत उलगडवून दाखवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जाणता राजा उपाधीने छत्रपतीना गौरवस्थान प्राप्त करून देणारे बाबासाहेब यांचा काही दिवसांपूर्वीच वयाची ९९ वर्षे पूर्ण केल्याचा आणि शंभरीत पदार्पण केल्याचा सोहळा पडला होता. त्यावेळी असे काही घडेल असे वाटलेही नव्हते. केवळ शिवभक्तच नाही तर इतर सर्व क्षेत्रातील कोणीही त्यांना कधीही विसरू शकणार नाहीत. आपल्या कार्यकर्तुत्वाने ते अमर झाले आहेत. अशा थोर बाबासाहेबाना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली, असं विधानपरीषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.