मोठी बातमी! बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर
बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात सिद्दिकी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या या हत्येचे संभाव्य कारण समोर आले आहे.
मुंबई : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागेच संभाव्य कारण समोर आले आहे.
बाबा सिद्दिकी यांची हत्या नेमकी का झाली?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत.
हत्या नेमकी कशी झाली?
बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघानी गोळीबार केला आहे. यातील दोन आरोपींची नावे ही करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. यातील पहिला आरोपी करनैल सिंह हा हरियाणा तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा आहे. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तीनही आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. तीनही आरोपी बाबा सिद्धिकी याची वाट पहात त्या ठिकाणी थांबले होते. या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष गोळ्या घालणाऱ्या तिघांव्यतिरिक्त आणखी एका आरोपीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा चौथा आरोपी तिघांना मार्गदर्शन करत होता. पोलिसांना तशा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवत होते.
बाबा सिद्दिकी यांच्यावर रात्री 8.30 वाजता अंत्यसंस्कार
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. त्यानंतर त्यांचा बडा कब्रस्तान येथे दफनविधी होईल.
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा :
तिघं आले, गोळ्या झाडल्या, पण सिद्दिकींच्या हत्येमागचा खरा नराधम वेगळाच? चौथा मास्टरमाईंड नेमका कोण?
रिक्षाने आले, वाट पाहिली, अन् थेट फायरिंग; बाबा सिद्दिकींवरील गोळीबाराचा कट नेमका कसा शिजला?