एक्स्प्लोर
औरंगाबादः पाणी न आल्यामुळं नागरिकांनी लाईनमनलाच डांबलं

औरंगाबादः पडेगाव येथील भुजबळनगर परिसरात सलग चार दिवस पाणी न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित लाईनमनलाच बांधून ठेवण्याचा प्रकार घडला आहे. पाणी पुरवठ्यासाठी नागरिक सतत पाठपुरावा करत होते, मात्र कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. औरंगाबाद शहराला सिटी वॉटर युटिलिटी या खाजगी कंपनीमार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र कंपनीचे जबाबदार अधिकारी नागरिकांच्या कसल्याही तक्रारी ऐकून घेत नसल्याची नागरिक तक्रार करत आहेत. चार दिवस उलटूनही कंपनीकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून नागरिकांनी वसीम शेख आणि सचिन वानी यांना विजेच्या खांबाला बांधलं. औरंगाबादकरांना सिटी वॉटर युटिलिटीच्या मनमानीला सामोरं जाणं काही नवीन नाही. मात्र चार दिवस जाऊनही पिण्याचं पाणी मिळत नसल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. या उलट सिटी वॉटर युटिलिटीचीच मनमानी सहन करावी लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
Before You Go
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















