एक्स्प्लोर

'कंटेनर पलटी, बिअर फरार!' पलटलेल्या कंटेनरमधून बिअरची पळवापळवी, तासात कंटेनर रिकामा, वैजापूरमधला व्हिडीओ व्हायरल

औरंगाबादच्या वैजापूर (Aurangabad Vaijapur Accident) तालुक्यातील करंजखेड येथे घडली. अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला.. आणि अवघ्या काही तासात लोकांनी कंटेनरची कंटेनर रिकामा केला.  

औरंगाबाद : 'पळवा पळवी' चित्रपटाची आठवण यावी अशी घटना औरंगाबादच्या वैजापूर (Aurangabad Vaijapur Accident) तालुक्यातील करंजखेड येथे घडली. अपघातात बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला.. आणि अवघ्या काही तासात लोकांनी कंटेनरची कंटेनर रिकामा केला.  याच बिअरच्या बॉक्सच्या पळवापळवीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत  

वैजापूर तालुक्यातील करंजखेडमध्ये काल रात्री 9 ते साडेनऊच्या दरम्यान बिअरच्या बॉक्सने भरलेला कंटेनर पलटी झाला. यानंतर बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स पळवण्याची स्पर्धा सुरू झाली.  बिअर  बॉक्स भरलेला कंटेनर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय जमेल तेवढ्या बाटल्या, जमेल तेवढे बॉक्स पळवायची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत कंटेनरचा चालक आणि क्लिनर जखमी झाला याची जाणीवही त्यांना नव्हती. काहींनी गोणी भरून बॉक्स पळवले तर काहींना टू व्हीलर वर बॉक्स वर बॉक्स घेऊन पळवापळवी केली.

जवळपास तास-दीड तास ही पळवापळवी सुरू होती. या कंटेनरमध्ये अठराशे बॉक्स होते. त्यातले तासाभरात सोळाशे पन्नास बॉक्स लोकांनी लंपास केले. काही लोकं याचं मोबाईलमध्ये शूटिंग करत होते. हे पाहताच आपण बॉक्स पळतोय हे लक्षात येऊ नये म्हणून काहींनी आपला शर्ट तोंडावरचा झाकला पण बाटल्या आणि बॉक्स काय सोडले नाहीत.

दारू म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.सध्या महागाई वाढली आहे आणि त्यात दारूच्या किमतीसुद्धा गगनाला भिडल्या आहेत. त्यात अशा पद्धतीने फुकट मिळत असेल मग मात्र तळीरामांची चांदीच म्हणावी लागेल.  लोकांनी झालेल्या अपघाताचा पुरेपूर उपभोग घेत दारूची लयलूट केली. बिअरचा कंटेनर पलटी होणं म्हणजे तळीरामांसाठी पर्वणीच होती. पण बियरच्या बॉक्स पुढे माणुसली मात्र हरली होती. कारण चालक आणि क्लिनर जखमी असताना देखील लोकांना त्याची जाणीव नव्हती. 

यापूर्वी देखील या रस्त्यावर डिझेलचा टँकर पलटी झाला होता. तेव्हाही लोकांनी जीव धोक्यात टाकून डिझेल गोळा केलं. आता लोकांनी बिअर गोळा केली.  

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget