एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : मदरसा..., अनुदान लाटण्याचं मशिन !

औरंगाबाद: मराठवाड्यात कागदावर मदरसे दाखवून संस्थाचालकांनी लाखो रुपयांचं अनुदान लाटल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझानं केलेल्या तपासणीत तर काही ठिकाणी लोकांना आपल्या गावात मदरसा आहे, याचीही माहिती नाही. तर काही ठिकाणी मराठी शाळेच्या नावावर मदरसा दाखवून अनुदान खिशात घातलं आहे. काय आहे मदरशांचं गौडबंगाल? मदरसा, मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा आधार. त्यामुळं मदरशांचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारनं डॉ. झाकीर हुसैन योजना सुरु केली. ज्याचं वास्तव काय आहे बघा.. सिल्लोड सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास मुलं इंग्रजी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र शिकतात. काहीवेळा तर मदरशांमध्ये कुणी फिरकतही नाही. बाकडी त्याची साक्ष देतात. पण अनुदान भरभक्कम. आता या हमदर्दचीच दुसरी शाळासुद्धा आहे. त्याची अवस्था पाहण्यासाठी माझाचा प्रतिनिधी पोहोचला. खरंतर ही इंग्रजी शाळा आहे. पण इथं मदरसा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मुलांना विचारल्यानंतर संस्थाचालकांची पोलखोल झालीच. स्पेशल रिपोर्ट : मदरसा..., अनुदान लाटण्याचं मशिन ! ठाणा, तालुका सोयगाव ठाणा गावात दोन मदरसे आहेत. पण इमारत नाही, मुलं नाहीत, इतर साहित्य नाही.. अनुदान मात्र बिनधोकपणे लाटलं जातंय. धनबाद हे गाव विकासापासून दूर आहे.. साधा रस्ता, पाणी, गटारंही इथं नाहीत.. पण इथं मदरसा आहे. तोसुद्धा कागदावर, पण अनुदान शंभर टक्के. मदरशांना वर्षाकाठी 4 लाख अनुदान मिळतं.  एकट्या औरंगाबादेत 500 मदरसे आहेत. त्यातल्या 125 मदरशांना अनुदान मिळालंय. 65 मदरशांच्या हातात पैसे पडलेत. तर 61 मदरशांचे पैसे जिल्हा प्रशासनाच्या खात्यात आहेत. आता ज्या गावांमध्ये एकही मुस्लिम घर नाही, तिथं दोन दोन मदरसे आहेत. तिथं मदरशाला इमारत नाही. मग मुलं कुठुन येतात? सरकारी अनुदानाचं काय होतं? असे शेकडो प्रश्न आहेत.  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना काय आहे? > 2013 मध्ये ही योजना सुरू झाली. > धार्मिक शिक्षणासोबत अत्याधुनिक शिक्षण मिळावं हा हेतू. > राज्यातील धर्मदाय आयु्क्त अथवा नक्फ बोर्डाकडे नोंदणी गरजेची. > तीन वर्षापूर्वी मदरसा चालवलेला असावा हा निकष  कोणत्या कारणासाठी अनुदान? >  पायाभूत सुविधेसाठी प्रत्येक मदरशाला 2 लाख रुपये > ग्रंथालयसाठी प्रत्येकी 50 हजार > 6 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रतिमहिना प्रतिशिक्षक 6 हजार मानधन > विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षक,  40 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक. > 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचं मानधन 8 हजार > प्रतिविद्यार्थी 4 हजार शिष्यवृत्ती,ही त्यामुळे हे अनुदान लाखोत आहे. औरंगाबदच्या जिल्हाप्रशासनालाही माहीत नाही की औरंगाबाद जिल्ह्यात नेमके मदरसे किती आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाची बदनामी करणाऱ्या या लोकांवर कारवाई करण्याची मागणी मौलवी आणि आमदार आब्दुल सत्तार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget