Aurangabad News : पाणी वाया घालवताय? सावधान! पाच नागरिकांना झाला दंड
Aurangabad News : पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना औरंगाबाद महानगर पालिकेने प्रत्येकी 150 रूपये दंड केला आहे.
Aurangabad News Update : पाणी वाया घालवणाऱ्या पाच नागरिकांना औरंगाबाद महानगर पालिकेने दंड केला आहे. शहरात सध्या उन्हाळ्यामुळे उद्भवलेल्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिलेल्या 10 सूत्री उपाय योजनांची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याचीच अंमलबजावणी करत सिंहगड कॉलोनी येथील पाणी वाया घालणाऱ्या एकूण पाच नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आलाय.
औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासकांनी सूचित केलेल्या उपाययोजनांमध्ये पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा देखील समावेश आहे. प्रशासकांच्या सुचनेची अंमलबजावणी करताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा पालक अधिकारी, डॉ, पारस मंडलेचा आणि पाणी पुरवठा उप अभियंता के. एम. फालक यांच्या पथकाने ही कारवाईक केली आहे.
सिंहगड कॉलोनी, ई-सेकटर एन-6 या भागात आज सायंकाळी (12 मे) चार वाजता पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी डॉ. मंडलेचा आणि फालक यांच्या पथकाचे कर्मचारी या भागात पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करत असताना पाच घरातून पाणी वाया जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासकांच्या सूचनांचे पालन करून या पथकाने घर मालक योगेश शिंदे, बेगम मोहम्मद देशमुख, नीलम मिसाळ, गजानन गणेशपुरे आणि इतर एकाकडून प्रत्येकी 150 रुपये दंड वसूल केला.
कारवाई केलेल्या पथकामध्ये भूषण देवरे (कनिष्ट अभियंता झोन क्रमांक 5), संगिता कुलकर्णी (कनिष्ठ अभियंता झोन क्रमांक 5), नंदकुमार झाडगे (SAW मलेरिया विभाग झोन क्र 5), बालाजी ढवळे (ब्रिंडीग चेकर्स), आणि झोन क्रमांक पाच मधील सर्व 16 मलेरिया कर्मचारी सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
Ulhasnagar : नागरिकांचा पालिकेत कामासाठी हेलपाटा अन् मनपा अधिकारी, कर्मचारी जंगी पार्टीत व्यस्त...
Strike : मुंबईतील पाणी टँकर असोसिएशन बेमुदत संपावर, 1500 टँकरचा संपात सहभाग
ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा होणार, उद्धव ठाकरे काय बोलणार? शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार?