एक्स्प्लोर

मनपा आयुक्त जेव्हा कचऱ्याचं वर्गीकरण करतात; स्वतःच डस्टबीनचा कचरा केला वेगळा

Waste Classification : मनपा आयुक्तांनी किराडपुरा भागातील आपल्या हाताने ओला आणि सुका कचरा वेगळा करून शहरातील सर्व नागरिकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे आवाहन केले.

Waste Classification : औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छ करण्यासाठी 'हम होंगे कामयाब' हा उपक्रम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेला आहे. या मोहिमेत नागरिकांनी शंभर टक्के कचरा वर्गीकरण करूनच द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. याचबरोबर नागरिकांचे प्रबोधन करून कचराबाबत त्यांची मानसिकता बदलण्याचा पर्याय देखील या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान हा उपक्रम सुरू असताना आज मनपा आयुक्तांनी किराडपुरा भागातील आपल्या हाताने ओला आणि सुका कचरा वेगळा करून शहरातील सर्व नागरिकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे आवाहन केले.  

मनपा आयुक्त जी श्रीकांत हे किराडपुरा भागातील स्वच्छता आणि कचरा संकलनचा आढावा घेण्यासाठी थांबले होते. यादरम्यान एक किशोरवयीन मुलगा दोन डस्टबीन घेऊन आला. त्याला बोलवून प्रशासकांनी डस्टबिन उघडून बघितल्यावर दोन्ही डस्टबिन मध्ये मिक्स कचरा आढळून आला. यावेळी त्यांनी दोन्ही डस्टबीन रिकाम्या करून स्वतः कचरा वेगळा करण्याची सुरुवात केली. त्या मुलाला पण ओला आणि सुका कचरा कसा ओळखायचा, दोन डस्टबीनमध्ये वेगळा ठेवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तर मी आयुक्त असताना कचरा हाताळतोय, माझे सफाई कामगार पण हाताने कचरा वेगळा करताय. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यांच्या घरचा कचरा वेगळा करून देण्यास लाजता कामा नये. नागरिकांनी महानगरपालिकेला ओला आणि सुका कचरा वेगळा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी केले. 

अन्यथा कचरा घेऊ नका...

एक ऑगस्ट 2023 पर्यंत नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा द्यावा, याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. या करिता सर्व 9 झोनमध्ये मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांचे  प्रबोधन केल्यानंतर देखील वर्गीकरण कचरा देण्यास जे नागरिक नकार देतील त्या नागरिकांचा मिक्स कचरा परत करण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. तसेच उघड्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांचा  कचरा देखील त्यांनाच परत करण्याचे निर्देश देखील यावेळी मनपा आयुक्तांनी दिले. 

महापालिकेची एका खुल्या जागेची पाहणी 

तसेच, आम्हाला खेळू द्या अभियानांतर्गत खारा कुवा, पान दरिबा या ठिकाणी मनपा आयुक्तांनी आज सकाळी महापालिकेची एका खुल्या जागेची पाहणी केली. सदरील जागेला स्वच्छ आणि व्यवस्थित करून या भागात मुलांसाठी आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या ठिकाणी महापालिकेची जुनी आणि बंद पडलेले वाचनालय आणि व्यायाम शाळा देखील आहे. याची पण पाहणी त्यांनी यावेळी केली. तसेच नागरिकांच्या इतर समस्या काय आहेत याची विचारपूस करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात चालतात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget