एक्स्प्लोर

औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली

कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली

औरंगाबाद: औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नाने आता उग्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली आणि कचराडेपोच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. महापुरुषांच्या प्रतिमा समोर मांडून नागरिक भजन आंदोलन करत आहेत. आज सोळाव्या दिवशी महापालिकेने तीसगाव परिसरातील गोलवाडी कचरा डेपो परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलवाडी आणि तीसगाव परिसरातील नागरिकांनी हा प्रयत्न हणून पाडला. एक छोटी रिक्षा कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली.  यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि राज्य शासनाकडून विभागीय आयुक्त यांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत, त्यांना 3 महिने मुदतीची मागणी केली.  यात नारेगावच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासोबत, नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही आयुक्तांनी तयारी दर्शवली. मात्र गावकरी त्यांच्या आधीच्या निर्णयावर ठाम आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास गावकरी तयार नाहीत. त्यामुळं प्रशासनाने आज तोडगा काढण्याच्या केलेला प्रयत्न असफल ठरला. गावकरी पुन्हा गावात जाऊन लोकांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. काय आहे औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न? गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 16 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही. औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र निश्चिंत आहेत. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget