एक्स्प्लोर

ऐन सणात औरंगाबाद हादरलं! एकाच दिवशी शहरात दोन हत्येच्या घटना; तिसऱ्याचा तपास सुरू

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप होत असतानाच शहरात दोन हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Aurangabad Crime: एकीकडे सर्वत्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना, दुसरीकडे औरंगाबाद शहर दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनेने हादरला आहे. तर तिसऱ्या घटनेत घात की अपघात याचा पोलीस तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप होत असतानाच शहरात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना शहरातील मोंढा नाका परिसरात तर दुसरी घटना मिटमिटा भागात घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी धाव घेत पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पहिल्या घटनेत औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्राइजेसवर कामाला असलेल्या  सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार पाशू नावाची व्यक्ती बाळाजी एंटरप्राईजेस येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होती. आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून 4 जण या ठिकाणी आले. दरम्यान पाशू यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. चोरट्यांनी यावेळी बीडीचे काही कार्टून्स चोरून नेले आहे. मात्र सकाळी घटना उघडकीस आली त्यावेळेस पाशू यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच डीसीपी उज्वला वनकर आणि क्रांती चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

आणखी एक मृतदेह सापडला...

मोंढा नाका येथील घटना ताजी असतानाच, औरंगाबाद शहर पोलीस हद्दीतील मिटमिटा भागात आणखी एक मृतदेह सापडला आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. मात्र मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाहीये. त्यामुळे शहरात दोन खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

तिसऱ्या घटनेचा तपास...

शहरात दोन खुनाच्या घटना घडल्या असतानाच, वाळूज पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा तीन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अय्युब उर्फ कालू  इस्माईल पठाण (वय 30 वर्षे रा. पठाणवाडा बिडकीन, औरंगाबाद) असे या तरुणाचे नाव आहे. त्यामुळे आता हा घात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर हा घातपात असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस तपासानंतर याबाबत खरे काय याची स्पष्टता होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातचMahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Embed widget