एक्स्प्लोर
VIDEO: औरंगाबादमधील फटाका बाजारातील अग्नितांडवाचा भीषण व्हिडिओ
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये गेल्या शनिवारी फटाका मार्केटला आग लागून 142 स्टॉल्स आणि 112 वाहनांचा जागीच कोळसा झाला. मात्र, काही मिनिटांच्या कालावधीत ती आग नेमकी भडकली कशी असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता.
औरंगाबाद फटाका मार्केट बेचिराख करणाऱ्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. एका स्टॉलला लागलेल्या आगीनं फटाके फुटायला सुरूवात झाली आणि बघता बघता आगीनं आजुबाजूच्या स्टॉल्सना आपल्या कवेत घेतलं.
आगीमुळं मार्केटच्या मैदानावर धुराचा लोट निर्माण झाला, त्यामुळं आग विझवण्यासाठी कुणीच पुढे जाऊ शकलं नाही. परिणामी दोन तासांत संपूर्ण फटाका मार्केटची राखरांगोळी झाली. दरम्यान, ही आग का लागली हे अजूनही न उलगडलेलं कोडंच आह. याप्रकरणी फटाका स्टॉलधारकांची चौकशी केली जाणार आहे
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement