एक्स्प्लोर
अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने चिमुरडीला अमानुष मारहाण
औरंगाबाद : अंगातील भूत काढण्याच्या बहाण्यानं एका अल्पवयीन मुलीला औरंगाबादेत जबर मारहाण करण्यात आलीये. सुनीता जाधव असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव असून गेली तीन वर्ष सुनीता या मुलीकडून घरकाम करुन घेत होती. पीडित मुलगी ही मूळची अकोला जिल्ह्यातली असून तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती सुनीताकडे काम करत होती. यावेळी मुलीच्या अंगात भूत शिरल्याचं कारण देत सुनीता जाधव या महिला मांत्रिकाने तिला जबर मारहाण केल्याचं कळतंय. मारहाणीत या मुलीला अनेक ठिकाणी जखमाही झाल्यात. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच सुनीता जाधव विरोधात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला असून सुनीताला पोलिसांनी अटक केलीये. अंधश्रदा निर्मूलन कायदया अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र























