एक्स्प्लोर
Advertisement
लातूरमधील कोविड केअर सेंटरमध्ये तहसीलदारांना मारहाणीचा प्रयत्न, गुन्हा दाखल
विलगीकरण कक्षात तहसीलदारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लातूरमधील निलंगा तालुक्यात घडली आहे. तहसीलदारांच्या अंगावर धावून गेलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भात लातूर जिल्ह्यात हळूहळू वाढत चाललाय. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील लोकांना विलगीकरन कक्षात ठेवण्यात येत आहे. याच विलगीकरण कक्षात तहसीलदारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लातूरमधील निलंगा तालुक्यात घडली आहे. सतत आमची तपासणी का करता? आम्हाला रिपोर्ट का देत नाहीत? असा राग मनात ठेवून पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांच्या अंगावर धावून गेलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील जाऊ या गावात हा प्रकार घडला.
लातूर जिल्ह्यातील जाऊ या गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील लोकांना या ठिकाणी विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी का करता? रिपोर्ट काय आले? ते का सांगत नाहीत? असा जाब विचारत या सेंटरवरील पाच लोक तिथे गेलेल्या तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले. तसेच मारण्याची धमकी दिली. यामुळे तहसीलदार गणेश जाधव यांनी किल्लारी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाच लोकांवर शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा लष्करे, आरिफ पटेल, आतीक पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद दुरानी, सय्यद सुभानी खान (रा. निलंगा) या पाच जणांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 533 इतकी आहे. तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525 इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण आजपर्यंत 1108 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. काल जिल्हाभरात 28 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement