एक्स्प्लोर
आईशी वाद घातल्याचा राग, संतप्त मुलाचा महिला वाहकावर हल्ला
अमरावती - माहुली रोड दरम्यान आज दुपारी साडेबाराच्या दरम्यानची ही घटना. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
![आईशी वाद घातल्याचा राग, संतप्त मुलाचा महिला वाहकावर हल्ला attack on women conductor in Amravati region आईशी वाद घातल्याचा राग, संतप्त मुलाचा महिला वाहकावर हल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/20154008/women-conductor.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : महिला वाहकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. आपल्या आईशी वाद घातल्यामुळे मुलाने या महिला वाहकावर हल्ला केला. यात गावंडे या महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तिकीट घेण्यावरून एका प्रवासी महिलेने या महिला वाहकाशी वाद घातला. अमरावती - माहुली रोड दरम्यान आज दुपारी साडेबाराच्या दरम्यानची ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
वाद घालणाऱ्या महिलेने गाव जवळ येत असल्याचं पाहून मुलाला फोन लावून बोलावून घेतलं. यानंतर त्या मुलाने काहीही न ऐकता तीक्ष्ण हत्याराने महिला वाहकावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या टोळक्यामध्ये चार ते पाच जणांचा समावेश होता.
दरम्यान, महिला वाहकांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. किरकोळ कारणावरुन टोळक्याने महिला वाहकावर हल्ला केला. त्यामुळे दोषींवर काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)