एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये कुऱ्हाडीने पोलिस कॉन्स्टेबलचा हात धडावेगळा
औरंगाबादः कौटुंबिक वादातून पोलिस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चुलत भावांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बमणे यांचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रकाश बमणे हे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कार्यरत आहेत.
प्रकाश बमणे कामावरुन परतत असताना औरंगाबादच्या हर्सुल नाका येथे त्यांना नातेवाईकांनी गाठलं. नातेवाईकांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये त्यांचा एक हात धडावेगळा करण्यात आला.
प्रकाश बमणेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिस का गप्प आहेत, हा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement