एक्स्प्लोर
पाणीपुरीचे पैसे न देणाऱ्या ग्राहकाला विक्रेत्याने चाकूने भोसकलं!

परभणी : परभणीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील वांगी रोडवर भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात पाणी पुरी विक्रेत्याने एकाचा चाकूने गळा कापून खून केला. एका पाणी पुरी विक्रेत्याने एवढ्या टोकाची भूमिका का घेतली, याबाबत मात्र अद्याप माहिती मिळाली नाही. भर रस्त्यात पाणीपुरीच्या गाड्यावर एकाला भोसकल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. परभणी शहर नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असते. आज दुपारी साडेचारच्या सुमारास भर रस्त्यात झालेल्या हत्येने अजून यामध्ये भर पडली आहे. शहरातील वांगी रोडवरील आरामशीन लगतच्या मुख्य रोडवर आरोपी बालाजी रेवणवारच्या पाणीपुरीचा गाडा लागलेला असतो. युनूस अमीन कुरेशी हा पाणीपुरीच्या गाड्यावर आला होता. युनूसने पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणी पुरी मागितली. पण युनीस हा नेहमीच दादागिरी करत फुकट पाणी पुरी खात होता आणि पाणी पुरीचे पैसे देत नव्हता. हा त्रास पाणी पुरी विक्रेत्याला नित्याचा झाला होता. अखेर विक्रेत्याने रागात येऊन कांदा कापण्याच्या चाकूने युनूसचा गळा कापला. तर युनुसच्या पोटात चाकू भोसकला. या घटनेत युनुसचा जाग्यावरच मृत्यू झाला.
आणखी वाचा























