एक्स्प्लोर
औरंगाबादेत भाजप पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला
औरंगाबाद भाजप जिल्हासरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर बेगमपुरा भागात हा हल्ला झाला.
औरंगाबाद : भाजपच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबाद भाजप जिल्हासरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर बेगमपुरा भागात हा हल्ला झाला.
संजय फत्तेलष्कर विद्यापीठ परिसरात व्यायाम करून परत येत होते. याचवेळी विद्यापीठ हॉस्टेल क्रमांक दोनजवळ असताना चार जणांनी तलवारीने हल्ला केला.
संजय फत्तेलष्कर यांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिरची पूड फेकून कारमध्ये आलेल्या चार ते पाच जणांनी तलवारीने हल्ला चढवला. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बेगमपुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement