यंदाची अटल इनोव्हेशन क्रमवारी जाहीर, महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्थांचा समावेश
देशात शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन वाढावे या उद्देशाने संशोधन क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली.
मुंबई : शिक्षणसंस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत (अटल इनोव्हेशन रॅंकिंग) पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) अनुदानित महाविद्यालयांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.
देशात शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन वाढावे या उद्देशाने संशोधन क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली. यंदाची (2021) क्रमवारी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी जाहीर केली. केंद्रीय विद्यापीठे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था (तंत्र) या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातल्या आयआयटी मुंबईने दुसरे स्थान पटकावले आहे. याच श्रेणीत मुंबई येथील वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटने पाचवे स्थान मिळवले आहे.
विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठ (सरकारी आणि सरकार अनुदानित) (तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ने सहावा क्रमांक तर याच श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आठवे स्थान प्राप्त केले आहे. तर विना अनुदानि विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठे (तंत्र) या वर्गवारीत महाराष्ट्राच्या सिम्बॉयसिस इंटरनॅशनलने दहावे स्थान मिळवले आहे.
सरकारी महाविद्यालये/ संस्था (सरकारी आणि सरकार अनुदानित ) (तंत्र) यामध्ये सर्वोच्च पाचमध्ये महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेने प्रथम स्थान पटकावले आहे. याच श्रेणीत मुंबई येथील वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटने पाचवे स्थान मिळवले आहे. तर खाजगी महाविद्यालये/ संस्था ( विना अनुदानित/ खाजगी)(तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने पहिले स्थान मिळवले आहे.
एआरआयआयए 2021 क्रमवारी विविध श्रेणींमध्ये जाहीर करण्यात आली. आयआयटी, एनआयटी यासारख्या केंद्रीय निधी प्राप्त तंत्र संस्था, राज्य विद्यापीठे, राज्य स्वायत्त तंत्र महाविद्यालये,बिगर तंत्र सरकारी आणि खाजगी विद्यापीठे आणि संस्था अशा श्रेणीत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. यावर्षी सहभागी संस्थांची संख्या दुप्पट होत 1438 झाली, तर पहिल्या क्रमवारीच्या तुलनेत चारपट झाली