Sangli Police : सांगलीत एक हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
Sangli Police : मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी चव्हाण यांनी रिक्षाचालकाकडे कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
Sangli Police : मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 1 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई केली. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.
मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव रवीशंकर चव्हाण असे आहे. एका वडाप रिक्षाचालकाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी दिनांक 10 जून रोजी केली होती.त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती.
त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एका हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्हाण यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यामध्येच रवीशंकर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ माजली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या