एक्स्प्लोर

मोठी बातमी! अश्विनी भिडे यांची बदली, मेट्रोतून थेट मंत्रालयात, आता सांभाळणार मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची बदली झाली आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashwini Bhide : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची बदली झाली आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी! अश्विनी भिडे यांची बदली, मेट्रोतून थेट मंत्रालयात, आता सांभाळणार मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हे ब्रिजेश सिंह हे पाहत होते. त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी

आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील 25 वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.  त्यामुळे त्यांना मुंबई मेट्रो वुमन म्हणून देखील ओळखले जाते. आता त्यांची बदली करण्यात आली असून, त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभरा सांभाळणार आहेत. 

श्रीकर परदेशी यांचीही नुकतीच केली होती बदली

राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.  2001 बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.  परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये देखील काम केलं आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वी  12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2001 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. 

महत्वाच्या बातम्या:

आरे मेट्रो कारशेडवरुन वादात अडकलेल्या मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची प्रधान सचिवपदी बढती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णआलयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णआलयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषणABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णआलयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णआलयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Embed widget