एक्स्प्लोर
... तोपर्यंत नारायण राणे काँग्रेसवासीच : अशोक चव्हाण
नारायण राणे यांचा निर्णय ते स्वतःच जाहीर करतील. मात्र तोपर्यंत ते काँग्रेसवासी आहेत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय. अशोक चव्हाण पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पंढरपूर : नारायण राणे यांचा निर्णय ते स्वतःच जाहीर करतील. मात्र तोपर्यंत ते काँग्रेसवासी आहेत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय. अशोक चव्हाण पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''नारायण राणे जेष्ठ नेते असल्याने याबाबतचा खुलासा तेच करू शकतील. मात्र सध्या तरी ते काँग्रेसवासीच आहेत. जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये आहेत, तोपर्यंत त्यांच्याबाबत मी वक्तव्य करणं, योग्य ठरणार नाही,'' असे सांगून अशोक चव्हण यांनी हात झटकले . दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल (26 ऑगस्ट रोजी) नारायण राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो नितेश राणेनी ट्विट केला. यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणखी रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या भेटीवरुन प्रतिक्रिया देताना नारायण राणेंनीही सूचक विधान केलं. ''गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवत असतो. फक्त पात्र वेगळी असतात. यावेळचं पात्र कोणतं असेल हे लवकरच कळेल'' असं वक्तव्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं होतं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. कर्जमाफी ही मुख्यमंत्री फडणवीस सरकारची फसवी घोषणा असल्याची टीका करीत राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच, हरियाणातील राम रहीम बाबाच्या प्रश्नावर बोलताना राज्य आणि केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात निष्क्रिय ठरल्याचंही ते यावेळी म्हणाले. न्यायालयाने ठपका ठेवूनही परिस्थिती सुधारत नाही, ही बाब चिंतेची असल्याचं मत त्यांना यावेळी व्यक्त केलं. संबंधित बातम्या गणराया नेहमीच वेगळं घडवतो, पात्र वेगळी असतात : राणे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री राणेंच्या घरी! नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला? राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!
गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?
अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच?
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























