एक्स्प्लोर

Ashok Chavan : केंद्रांच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, त्यामुळेच अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम?

Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेले की त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव होता असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई: अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव असलेल्या आदर्श घोटाळ्याचा (Adarsh Scam) उल्लेख केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आणि चारच दिवसात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी आपली राजकीय भूमिका उघड केली नसली तरीही ते भाजपमध्येच जाणार हे काही लपून राहिलं नाही. केंद्रातील भाजप सरकारच्या झटक्यानंतरच अशोक चव्हाणांनी आपली भूमिका बदलली असल्याची चर्चा आहे. 

आदर्श घोटाळ्याचा तपास सुरूच

केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कारकिर्दीवर श्वेतपत्रिका काढली आणि त्यानंतर काँग्रेसवर चांगलीच टीका केली. या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी संपल्या नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळेच की काय अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. 

अशोक चव्हाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं अलीकडेच काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी भाजपला साथ दिली. आता श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

काय आहे आदर्श घोटाळा? 

अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीला गळती लागल्याचे म्हटलं जाते.  

काँग्रेसमधून आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजीनामा दिला याला काही कारण नाही, सगळंच काही सांगता येणार नाही, बरीच वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आता मला वेगळा पर्याय शोधावा असं वाटलं. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Embed widget