Ashok Chavan : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Ashok Chavan Resigns :भाजपमध्ये जायचं अद्याप ठरलं नसून येत्या एक दोन दिवसात आपण राजकीय भूमिका ठरवू असं अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन.
मी काँग्रेससाठी बरंच काही केलं
काँग्रेसने आतापर्यंत आपल्यासाठी बरंच काही केलं, आपणही काँग्रेससाठी खूप काही दिलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. भाजपच्या प्रवेशावर ते म्हणाले की, भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन.
काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय?
काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय असं विचारणा करण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असे काही नाही. मी जन्मपासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले. आता मला वाटतं मला आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला.
तुमच्यासोबत किती आमदार?
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर तुमच्यासोबत किती आमदार येतील असा प्रश्न विचारल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, पक्षाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी कोणत्याही आमदारांशी, सहकार्यांशी चर्चा केली नाही. मी माझा निर्णय येत्या एक दोन दिवसात ठरवेन.
ही बातमी वाचा: