![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट! देहू नगरीतून संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; वारकऱ्यांची मांदीयाळी
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले.
![Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट! देहू नगरीतून संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; वारकऱ्यांची मांदीयाळी ashadi wari 2023 shri sant tukaram maharaj palkhi processions start from dehu Ashadhi Wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट! देहू नगरीतून संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; वारकऱ्यांची मांदीयाळी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/10/ba36f253b69087af98f9a8a35f53e1e51686399307495442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashadhi Wari 2023 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. यावर्षीचा हा 338वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेले आहेत. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
हजारो वारकऱ्यांच्या तोंडी विठुरायाचा गजर सुरु होता.हाती टाळ, डोक्यावर तुळस घेत वारी सोहळ्यासाठी वारकरी आतुर झाले आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान एकाच तालावर वारकऱ्यांनी ठेका धरला. अवघा मंदिर परिसर वारकऱ्यांच्या येण्याने गजबजून गेला. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)