एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वारी पंढरीची : माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला, जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाप
जेजुरीमध्ये पोहोचणाऱ्या माऊलीच्या पालखीवरती याठिकाणी भंडारा उधळला जातो. जेजुरीत पोहोचणाऱ्या माऊलींच्या पालखीचं दोन वेळा स्वागत केलं जातं. स्वागताचा पहिला मान खंडोबा देवस्थानचा तर दुसरा स्वागत जेजुरी नगरपालिकेचा असतो.
जेजुरी : सासवडहून सकाळी निघालेल्या माऊलीची पालखीने आज जेजुरीसाठी प्रस्थान केले. आज जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाप होतो. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 17 मुक्काम करून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणी असतो. कारण अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन त्यांना मिळते. येथे शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाफ होतो आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष होतो.
आज सकाळपासूनच माऊलींच्या पालखीच्या दिंडी आणि वारकरी जेजुरीकडे कूच करत होते. जेजुरीला आल्यानंतर वारकऱ्यांनी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतलं. यावेळी भंडारा उधळत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष केला.
जेजुरीमध्ये पोहोचणाऱ्या माऊलीच्या पालखीवरती याठिकाणी भंडारा उधळला जातो. जेजुरीत पोहोचणाऱ्या माऊलींच्या पालखीचं दोन वेळा स्वागत केलं जातं. स्वागताचा पहिला मान खंडोबा देवस्थानचा तर दुसरा स्वागत जेजुरी नगरपालिकेचा असतो.
माऊलींची पालखी बरोबर गडावरच्या मंदिरासमोर खाली येते. त्यावेळी त्या पालखीवर भंडारा उधळला जातो आणि माऊलींना पिवळं केलं जातं. हाच क्षण अनुभवण्यासाठी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी यावेळी जेजुरी पंचक्रोशीतील गावकरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
तुकोबांच्या पालखीत भक्ती आणि लावणीची जुगलबंदी
घुंगराचा छनछनाट, टाळ मृदुंगाचा नाद. लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाप. अशा भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. जगतगुरू तुकाराम महाराजांची पालखी आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाली असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली. या वेळी या नर्तिकांनी विठुरायाच्या भक्ती गीतांवर टाळ धरला. सोबतच लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर ठेवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement