एक्स्प्लोर

...तर वंचित बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडेन : असदुद्दीन ओवेसी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्यासंबंधी आवाहन करत आहेत. मात्र एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध आहे. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, एमआयएम नको असेल तर मी बाहेर पडायला तयार आहे.

नांदेड : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल, तर वंचित बहुजन विकास आघाडीतून एमआयएम बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी केलं आहे. नांदेडमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीच्या सभेत ओवेसी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचं आवाहन करत आहेत. मात्र एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध आहे. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे.

"तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या. मी एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आणि आघाडी करा. प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य केल्यास मी स्वतंत्र सभा घेऊन आघाडीचं स्वागत करेन", असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं.

ओवेसी यांच्या भूमिकेचं प्रकाश आंबेडकर यांनीही स्वागत केलं. तसेच वंचितांच्या सत्तेसाठी ओवेसी यांनी ही भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका

तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी हैदराबादला जाऊन एमआयएमला आव्हान दिलं होतं. त्यावर बोलताना, आता मी थेट अमेठीला जाऊन भडकावू भाषण देणार असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी दिला.

राहुल गांधींनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही ओवेसी यांनी निशाणा साधला. भ्रष्टाचार फक्त छगन भुजबळ यांनीच केला होता का? साहेबांच्या पुतण्याने काहीच खाल्लं नाही का? असं बोलत ओवेसी यांनी अजित पवारांसर शरद पवारांवर निशाणा साधला. छगन भुजबळांना दोन वर्ष तुरुंगात ठेवणं हा अन्याय आहे. आपल्यासोबत काय घडलं? हे आता त्यांनाही समजलं असेल, असं ओवेसी म्हणाले.

डोबिंवली शस्त्रसाठा कारवाईबाबत पोलिसांचं अभिनंदन

डोंबिवलीत भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईबाबत बोलताना ओवेसी म्हणाले, "डोबिंवलीत आरएसएसच्या घरात धाडी मारण्याचे धैर्य पोलिसांनी दाखवलं. या कारवाईबाबत पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे."

तर नागपूरमधील रेशीमबागेत धाड मारा, तिथे एके 47 सापडलीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला 'या' हँडसम हंकचा कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचे दिग्गज अभिनेत्यावर गंभीर आरोप
Dharashiv Politics: भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
TV Actress Nupur Alankar Left Showbiz: टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmer Protest: कोल्हापुरात ऊस दराचं आंदोलन चिघळलं, कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रक अडवले
Mission Mumbai: 'नाराज नेत्यांना नवी पदं, हजारो नियुक्त्या'; मुंबई जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार फिल्डिंग
Voter List Cleanup: MVA-MNS च्या तक्रारीनंतर 'दुबार मतदारांवर' निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
Voter List: मतदार याद्या अपडेट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्याची मागणी
Farmer Distress: 'नुकसान कसं भरुन निघणार?' 2 लाखांच्या खर्चावर फक्त ₹7650 मदत, शेतकरी संतप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला 'या' हँडसम हंकचा कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचे दिग्गज अभिनेत्यावर गंभीर आरोप
Dharashiv Politics: भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी
TV Actress Nupur Alankar Left Showbiz: टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
Embed widget