(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळताच शरद पवार गटाचा सोशल मीडियात सर्जिकल स्ट्राईक सुरु!
Sharad Pawar Vs Ajit Pawar : आमचा पक्ष शरद पवार आमचे चिन्ह शरद पवार अशा पद्धतीने शरद पवार गटाकडून सोशल मीडियामध्ये प्रचार जोरदारपणे करण्यात येत आहे.
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर बदल शरद पवार गटाकडून सोशल मीडियामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे.
येतील वादळे, खेटेल तुफान,
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही..
आमचा पक्ष पवार साहेबच... pic.twitter.com/s8noukl6VT
आमचा पक्ष शरद पवार आमचे चिन्ह शरद पवार अशा पद्धतीने शरद पवार गटाकडून सोशल मीडियामध्ये प्रचार जोरदारपणे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जोरदारपणे प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. इतकंच नव्हे, तर शरद पवार यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.
२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!#sharadpawar… pic.twitter.com/agB3W4nROh
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
या ट्विटमध्ये ते आपला निर्धार व्यक्त करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियात आमचा पक्ष, आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असे म्हणत फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना आमचा पक्ष, आमचा चिन्ह फक्त शरद पवार साहेब असल्याचे म्हटलं आहे.
शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2024
याच नावासाठी लढत होतो,
याच नावासाठी लढतोय,आणि
याच नावासाठी लढत राहणार..! pic.twitter.com/JWeuazyK2X
लोकशाहीची क्रूर थट्टा चालू आहे.
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) February 6, 2024
२ जुलै रोजी माझ्या काही सहकारी आमदारांनी भाजप बरोबर जाण्याची भुमिका घेतली. ही जर पक्षाची भुमिका होती, तर माझ्यासारख्या आमदाराला याची यत्किंचितही कल्पना नव्हती. मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांताध्यक्ष यांच्या भुमिकेबरोबर राहिलो. आणि आज…
सत्तेसाठी झपाटलेल्या दिल्लीच्या कवठ्या महाकाळ ने पक्ष आणि चिन्ह लोकशाहीची हत्या करुन काढुन घेतले. दिल्ली वाल्याची बोलके बाहुले सातत्याने सांगत होते की पक्ष आणी चिन्ह आम्हालाच मिळेल म्हणुन, आदरणीय शरद पवार साहेब यांचा पक्ष चोरला, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला.(1/1) pic.twitter.com/oPlLDnpnMZ
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) February 6, 2024
मिटा नही सकता इस हस्ती को
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) February 6, 2024
ना तेरा जुल्म, ना तेरा कोई वार...
शायद तुमने अभी तक जाना नही
क्या चीज है, शरद पवार l #सदैव_साहेबांसोबत@PawarSpeaks @Jayant_R_Patil@NCPspeaks @supriya_sule pic.twitter.com/g063I6OZoz