एक्स्प्लोर
तपश्चर्या बेचिराख, शिल्पकार प्रमोद कांबळेंना मदतीचा हात द्या!
निसर्ग किंवा देव या सृष्टीचा निर्माता आहे, असं म्हणतात. तशी ताकद फक्त कलाकारात असते. तोच देवानं घडवलेली दुनिया हुबेहूब साकारु शकतो. त्यामुळे कांबळेंच्या बेचिराख स्वप्नांचं वर्तमान वेदनेचं आभाळ होऊन त्यांच्या डोक्यावर उभं आहे. ज्याची भरपाई फक्त नव्या निर्मितीनंच शक्य आहे.

अहमदनगर : कलातपस्वी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत मोठी कलासंपदा खाक झाली. महाराष्ट्रभरातून हळहळही व्यक्त झाली. पण त्यापुढे जाऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओची नव्यानं निर्मिती करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं. दगडात जीव ओतणारा हा जादूगार अर्थात प्रमोद कांबळे. काल 1 वाजण्याच्या सुमारास नगरमधील त्यांच्या स्टुडिओला आग लागली. ज्यात अनमोल शिल्पं, चित्रं, कलाकृती खाक झाल्या. 20 वर्षांची तपश्चर्या अवघ्या काही मिनिटात बेचिराख झाली. पण ही वेदना बाजूला ठेऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या पंखांना बळ देण्याचं आवाहन केलं आहे. साठीच्या दशकात ए. ए. आलमेलकरांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर त्यांना मुकुंदराव किर्लोस्करांनी दिलेल्या सल्ल्याचीही आठवण प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकरांनी करुन दिली. VIDEO : सुहास बहुळकर यांनी काय आवाहन केले? गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्रमोद कांबळे एमआयडीसीतील त्यांच्या स्टुडिओत काम करायचे. देवदेवतांची शिल्पं, प्राण्यांच्या मोठमोठ्या कलाकृती, दिग्गजांची रेखाटलेली चित्रं, अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार अशा हिरामाणकांपेक्षा मौल्यवान चीजवस्तूंनी ही जागा समृद्ध होती. त्यामुळे तेच सौंदर्य आणि श्रीमंती परत आणण्यासाठी आता मोठ्या आर्थिक ताकदीची गरज आहे. प्रमोद कांबळे हे फक्त कलाकार नाहीत, ते कलेचं चालतंबोलतं विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे बऱ्याच कलाकारांनी धडे गिरवले. शेकडो पुस्तकं, जर्नल्स अशी ज्ञानसंपदाही खाक झाली. निसर्ग किंवा देव या सृष्टीचा निर्माता आहे, असं म्हणतात. तशी ताकद फक्त कलाकारात असते. तोच देवानं घडवलेली दुनिया हुबेहूब साकारु शकतो. त्यामुळे कांबळेंच्या बेचिराख स्वप्नांचं वर्तमान वेदनेचं आभाळ होऊन त्यांच्या डोक्यावर उभं आहे. ज्याची भरपाई फक्त नव्या निर्मितीनंच शक्य आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांना मदत करण्यासाठी तपशील :
VIDEO : शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्याशी खास बातचित :
VIDEO : शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्याशी खास बातचित : आणखी वाचा























