एक्स्प्लोर

काँग्रेसने आमदारकी देऊनही गद्दारी, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर कट्टर विरोधक खोतकरांचा टोला, म्हणाले, भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा डाव

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर टीका केलीय.

Arjun Khotkar on Kailash Gorantyal : जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर गोरंट्यल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महाशयांनी माझा गद्दार म्हणून उल्लेख केला होता. काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली? असा सवाल खोतकरांनी केलाय. नगरपालिकेची चौकशी लागल्यामुळेच भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा डाव असल्याचे खोतकर म्हणाले. 

जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार, नेमकं काय म्हणाले कैलास गोरंट्याल?

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. पक्षप्रवेश करताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आमचे मित्र संजय केनेकर किती दिवसांपासून माझ्या लागले होते की पक्षप्रवेश करा. त्यामुळे आज मी भाजपात प्रवेश करत आहे. मी तुम्हाला शब्द देतो की जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार. जी उरलेली काही वर्ष आहेत त्यात मी भाजपची सेवा करेन.

फक्त तिकीट देऊन काही होत नाही, जी रणनीती करायला पाहिजे होती

मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही रावसाहेब दानवे, अतुल सावे माझे मित्र होते. मी नवीन आमदार असताना मंत्रीपदात माझं नावं द्यायला पाहिजे होतं. रनींग आमदाराचे नाव तिसऱ्या यादीत होतं. फक्त तिकीट देऊन काही होत नाही, जी रणनीती करायला पाहिजे होती ती केली नाही. माझ्यासोबत जे आले ते इथे आहेत, जे आले नाहीत त्यांना आशिर्वाद आहेत. कुणाल पाटील, संग्राम जगताप माझे मित्र आहेत. तिकीट वाटपात चुक झाली, काँग्रेसच्या बंडखोराला मॅनेज करता आलं नाही. पार्टी वेगळी आहे, मी काय शिंदेगटात नाही भारतीय जनता पक्षात आहे. दानवे, लोणीकर, सावे माझे मित्र आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Jyoti Waghmare : राज्यसभेची उमेदवारी जिजाऊंच्या हातच्या तलवारीची, सावित्रीमाईच्या हातच्या पाटीची अन् बाबासाहेबांच्या लेखणीची; ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया 
राज्यसभेची उमेदवारी जिजाऊंच्या हातच्या तलवारीची, सावित्रीमाईच्या हातच्या पाटीची अन् बाबासाहेबांच्या लेखणीची; ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget