एक्स्प्लोर

उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट; विदर्भात वादळी पावसाचा इशारा

ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. तर, विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

मुंबई : उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. चंद्रपूर, परभणी, हिंगोलीत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस कोसळलाय. तर, विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. अरबी समुद्रातून सध्या वारे वाहतायत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालंय. प्रामुख्याने विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील काही भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भामध्ये 10 ते 12 मार्च या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मागील आठवड्यात अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. दोन मार्चला सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे कर्जमाफीतून सावरलेला शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने मंगरुळपिर बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं. तर शेतात उभं असलेल्या रब्बी पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद; देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले... हिंगोली हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री आणि सकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार झटका दिलाय. औंढा नागनाथ, वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील काही भागात रात्री दोन वाजता आणि सकाळी नऊ वाजता जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गहू, हरभरा, ज्वारीची काढणी सुरू असतानाच हा पाऊस झाल्यानं पिकांची मोठी हानी झालीय. तर, कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, रामेश्वर तांडासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. परभणी हिवाळा संपत आला अन् उन्हाळा सुरू होत आला तरीही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलीय. तब्बल 15 मिनिटं शहरात हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच बदलत्या हवामानाचा फळ पिकांनाही चांगलाच फटका बसतोय. Unseasonal rain | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मोताळा शहरासह तालुक्यातील डिडोळा, शेंबा या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील गहु, हरबरा पिकाला फटका बसलाय. चंद्रपूर चंद्रपूर शहरातील वातावरणात अचानक बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. होळी-रंगपंचमीच्या पर्वावर गर्दी वाढत असताना यामुळे खरेदीला ब्रेक लागलाय. तर, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. Non-Seasonal Rain | अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानावर विधानसभेत नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget