एक्स्प्लोर

लॉकडाऊनमध्ये सदाभाऊ खोतांकडून आंदोलनाची घोषणा, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 15 मे पासून आंदोलन

लॉकडाऊनमध्ये सदाभाऊ खोत 15 मे पासून आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना लॉकडाऊनचा कोणताही नियम न तोडता आंदोलन करणार आहे.

सांगली : मागील सरकारमध्ये 5 वर्ष कृषी राज्यमंत्री राहिलेले सदाभाऊ खोत लॉकडाऊन काळात एक आंदोलन उभारत आहे. लॉकडाऊन चालू असताना देखील सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी खोत यांनी लॉकडाऊनचा कोणताही  नियम मोडला जाणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
'अंगण हेच माझे आंदोलन' या स्लोगनखाली हे आंदोलन 15 मे पासून राज्यभर उभारले जाणार आहे.  हे आंदोलन अंगणात, शेतात बसून केले जावे आणि सरकार दरबारी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दाखवून द्याव्यात असे आवाहन खोत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा आणि विविध प्रश्नावर हे आंदोलन करण्यात येत असून तमाम शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलनामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन माजी मंत्री खोत यांनी केले आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून या शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून कोरोनाच्या या स्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.
काय आहेत मागण्या
रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. अंगण हेच माझे आंदोलन अशा स्वरूपाचे हे आंदोलन असून शेतकऱ्यांचा साता बारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेती माल खरेदी करावे किंवा प्रति क्विंटल 1 हजार या अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळं फळ-भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, त्याच बरोबर रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजुरांना मोफत धान्य आणि 2 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Embed widget