Anna Hajare : अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे
Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत अण्णांची मनधरणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. तसेच वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्यातून हरकती मागवल्या जातील त्या हरकतींचा सूर लक्षात घेऊन निर्णयाच्या अंमलबजावणी करायची की नाही तो निर्णय घेतला जाईल असं नायर यांनी अण्णांना सांगितले. वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत बोलताना अण्णांनी मी सरकारच्या निर्णयाबाबत 50 टक्के समाधानी असून उपोषणाबाबत ग्रामसभेत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अण्णांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून उपोषण करू नये असा ठराव ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला. याबाबत बोलताना अण्णा म्हणाले की, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून अशा सरकारच्या राज्यात मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसं न झाल्यास याला लोकशाही कसं म्हणता येईल. असे निर्णय घेणे म्हणजे एक प्रकारची हुकूमशाहीच असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.
मात्र, ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर ठेवत मी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला असून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा सरकारचा 2001 पासून प्लॅन होता- अण्णा हजारे -
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतली मात्र, मी ग्रामसभेनंतर निर्णय घेईल असं अण्णांनी म्हटले होते.त्यानुसार आज अण्णांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार उद्या उपोषण न करण्याचा निर्णय घेतला मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला नसून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे... तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे...